साऊथ इंडियन बँकेमधून वेगवेगळे 8 कर्जे मिळतात ऑनलाईन पद्धतीने;पहा सर्व माहिती | South Indian Bank Loans

South Indian Bank Loan

South Indian Bank Loans : केरळ राज्यातून सुरुवात झालेल्या आणि दक्षिण भारतामध्ये विस्तारलेल्या साउथ इंडियन बँकेची सुरुवात 1946 मध्ये झाली. साउथ इंडियन बँक पहिली प्रायव्हेट बँक आहे ज्या बँकेला शेड्युल बँक म्हणून रिझर्व बँकेने दर्जा दिला. साउथ इंडियन बँक पहिली शाखा आहे ज्यांनी NRI साठी सुविधा पुरवण्याचे काम केले.

मार्च 1993 मध्ये या बँकेने औद्योगिक क्षेत्राला वित्त पुरवठा करण्याचे काम सुरू केले, साउथ इंडियन बँक दक्षिण भारताव्यतिरिक्त भारतामध्ये इतर ठिकाणी सुद्धा उपलब्ध आहे, या बँकेच्या एकूण 946 शाखा असून एक सर्विस शाखा आहे. 1180 एटीएम सह ही बँक संपूर्ण भारतभर पसरलेली आहे.

या बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीन 130 संपूर्ण भारतात उपलब्ध आहेत, विविध अवॉर्ड्स ने बँकेला सन्मानित करण्यात आलेला आहे 2009 पासून 2023 पर्यंत जेवढे अवॉर्ड बँकेला मिळाले या सर्वांची सूची त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

या बँकेमध्ये विविध प्रकारचे बचत खाते, चालू खाते, टर्म डिपॉझिट, म्युचल फंड, इन्शुरन्स, सरकारी खात्याच्या सर्व सर्विसेस व वेल्थ मॅनेजमेंट सर्विस सुद्धा दिली जाते. या सर्व व्यतिरिक्त साऊथ इंडियन बँक सर्वसामान्य नागरिकांना वैयक्तिक कर्ज, कार लोन, गृह कर्ज, शैक्षणिक लोन, सोनेतारण कर्ज, प्रॉपर्टी लोन, कमर्शियल व्हेईकल लोन तसेच एसआयबी डेकोर लोन सुद्धा देते.

साउथ इंडियन बँकेमार्फत देण्यात येणाऱ्या विविध पाच ते सहा कर्जाचा (South Indian Bank Loan) सविस्तर तपशील खाली दिलेला आहे ते तपशील पाहून त्या पद्धतीने तुम्ही या बँकेमध्ये सविस्तर कर्जासाठी अर्ज करू शकता.

वैयक्तिक कर्ज (South Indian Bank Personal Loan)

वैयक्तिक गरजा भागवण्यासाठी साउथ इंडियन बँक वैयक्तिक कर्जाचा पर्याय तुमच्या पुढे ठेवते शिक्षण, मेडिकल, ट्रॅव्हल, असेट परचेस किंवा कर्ज फेडण्यासाठी, व्यवसायामध्ये वर्किंग कॅपिटल, कॅपेक्स यासाठी सुद्धा हे बँक कर्जाचा पुरवठा कर. वैयक्तिक कर्ज पगारदार वर्ग, पब्लिक प्रायव्हेट सेक्टर मधील कंपन्या आणि नॉन रेसिडेंट इंडियन नागरिक सुद्धा घेऊ शकतात.

यासाठी कमीत कमी वय 21 वर्षे आणि जास्तीत जास्त वय 65 वर्षे असणे आवश्यक आहे एक लाखापासून वीस लाखापर्यंत ही बँका कर्जाचा पुरवठा करते, 12 ते 60 महिन्यांमध्ये तुम्हाला या हप्त्याची परतफेड करायला लागते. तुमचं दर महिन्याला 25 हजार एवढं ग्रॉस इन्कम आणि तुमचा क्रेडिट स्कोर 740 पर्यंत असण गरजेचा आहे.

तुम्ही पगारदार वर्गातून येत असाल तर कमीत कमी दोन वर्षे तुम्ही एका कंपनीमध्ये असायला हवेत आणि व्यवसाय म्हणून तुम्ही अर्ज करत असाल तर कमीत कमी तीन वर्षे जुना तुमच्या व्यवसाय (South Indian Bank Loan) असायला हवा.दोन टक्के एवढे प्रक्रिया शुल्क वैयक्तिक कर्जासाठी आकारते.

फोर क्लोजर किंवा कालावधीअगोदर कर्ज फेडायचे असतील तर त्यासाठी सुद्धा ही बँक चार्जेस आकारते त्यामुळे तुम्ही त्यांच्या साइटवर जाऊन हे सविस्तर माहिती घेऊ शकता. कागदपत्रांमध्ये ओळखीचे प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट फोटो, मागचे तीन महिन्याचे पगार पत्रक, नवीन फॉर्म 16 किंवा आयटी रिटर्न आणि मागच्या सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट तुम्हाला बँकेकडे जमा करायला लागते.

सर्व कागदपत्रे दिल्यानंतर तुम्ही वैयक्तिक कर्जासाठी (South Indian Bank Loan) पात्र होऊ शकतात तुमची एलिजिबिलिटी त्यांच्या बँकेच्या एलिजिबिलिटी कॅल्क्युलेटर जाऊन पाहू शकता व ऑनलाईन अर्ज सुद्धा करू शकता.

कार लोन (South Indian Bank Loan – Car Loan)

साउथ इंडियन बँकेमार्फत नवीन कार घेण्यासाठी, जुनी कार विकत घेण्यासाठी लोनचा पुरवठा करते, ही बँक भारतीय नागरिक तसेच भारताबाहेरील नागरिकांसाठी सुद्धा कार लोनचा पुरवठा करते, यासोबतच ही बँक शेतकरी वर्ग, विविध कंपन्या आणि पेन्शनर्स सुद्धा कार लोनचा पुरवठा करते.

यासाठी वयोमर्यादा कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 65 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे, या बँकेमार्फत एक लाख ते शंभर लाखापर्यंत कर्ज दिले जाते, हे कर्ज तुम्ही 12 महिने ते 84 महिन्यांमध्ये फेडू शकता साउथ इंडियन बँकेमार्फत नवीन कार खरेदी करण्यासाठी 95 टक्के आणि जुन्या कार साठी 75 टक्के एवढा कर्जाचा पुरवठा केला जातो.

तुमचा सिबिल स्कोर 740 प्लस असेल तर कमीत कमी दोन वर्ष तुम्ही जॉबला असाल किंवा जास्तीत जास्त तीन वर्षे तुमचा बिजनेस असेल तर तुम्ही साउथ इंडियन बँकेकडून कार लोन घेऊ शकता.

कार लोन साठी एक टक्का एवढे प्रक्रिया शुल्क बँक आकारते, कार लोन (South Indian Bank Loan) घेण्यासाठी तुम्हाला ओळखीचे प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट साईज फोटो, मागच्या दोन महिन्याचे पगार पत्रक, मागच्या दोन वर्षाचे आयटी रिटर्न किंवा फॉर्म 16, मागच्या सहा महिन्याचे अकाउंट स्टेटमेंट आणि तुम्ही जे कार घेणार आहात त्याचे एग्रीमेंट किंवा परफॉर्म इन्व्हाईस सोबत जोडावे लागते.

यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन लोन या सेक्शन मध्ये जाऊन कार लोनला अर्ज करू शकता.

गृह कर्ज (SIB Home Loan)

साउथ इंडियन बँक नवीन फ्लॅट घेण्यासाठी, जुना फ्लॅट विकत घेण्यासाठी, जागा घेण्यासाठी, घराचे बांधकाम करण्यासाठी तसेच घराचे रिपेअर किंवा री कन्स्ट्रक्शन करायचे असेल तर त्यासाठी सुद्धा बँक (South Indian Bank Loan) कर्ज देते. हे कर्ज पगारदार वर्ग, व्यावसायिक तसेच प्रोफेशनल असतील.

शेतकरी वर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा ही बँक गृह कर्जाचा पुरवठा करते या कर्जासाठी तुमचं वय 21 वर्ष आणि जास्त जास्त 65 वर्ष असणं आवश्यक आहे. 65 वर्षापेक्षा जास्त वय असेल तर हे कर्ज तुम्हाला मिळू शकणार नाही. हे कर्ज कमीत कमी पाच लाख ते जास्तीत जास्त 100 लाखापर्यंत तुम्हाला मिळू शकते.

कमीत कमी पाच वर्ष आणि जास्तीत जास्त तीस वर्षांमध्ये या (South Indian Bank Loan) कर्जाचा हप्ता तुम्ही फेडू शकता, याचं व्याजदर बँकेचे वेबसाईटवर दिलेला आहे. तिथे जाऊन तुम्ही व्याजदर बघून अर्ज करू शकता, 90% पर्यंत ही बँक कर्जाचा पुरवठा करते. सिक्युरिटी म्हणून तुम्ही घेतलेली जी असेट असेल ती बँकेकडे गहाण असते.

या कर्जावर तुम्हाला टॉप-अप लोन ची सुविधा सुद्धा बँक देऊ करते प्रक्रिया शुल्का मध्ये0.50 टक्के व जीएसटी एवढे अमाऊंट हे बँका आकारते लोन अगोदर फेडायचे असेल तर कोणते चार्जेस बँक घेत नाही बँकेच्या कागदपत्राविषयीची सगळी माहिती त्यांच्या वेबसाईटवर दिलेले आहे कोणकोणती कागदपत्र बँकेला लागतील हे तुम्ही पाहू शकता आणि त्यानुसार तुम्ही अर्ज करू शकता.

केवायसी डॉक्युमेंट्स मध्ये तुम्हाला दोन पासपोर्ट साईज फोटो, ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, पगारदर वर्गातून येत असाल तर मागच्या तीन महिन्याचे सॅलरी स्लिप, मागच्या दोन वर्षाच्या आयटी रिटर्न आणि मागच्या सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट सोबत जोडणे गरजेचे आहे गृह कर्ज साठी साउथ इंडियन बँक चांगला पर्याय आहे एकदा त्यांच्या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही सहजरीत्या अर्ज सादर करू शकता.

शैक्षणिक कर्ज (South Indian Bank Education Loan)

साउथ इंडियन बँक भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर शिक्षण घेण्यासाठी वेगळ्या योजनांद्वारे कर्जाचा (South Indian Bank Loan) पुरवठा करते, शासनाच्या योजना व्यतिरिक्त विविध योजना ही बॅंक राबवते.या कर्जाच्या रकमेतून तुम्ही पदवी किंवा त्यापुढील शिक्षण घेऊ शकता. हे शिक्षण तुम्ही भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर दोन्हीकडे घेऊ शकता.

साउथ इंडियन बँकेमध्ये एसआयबी ग्लोबल एज्युकेशन, स्किल लोन, एस आय बी विद्यानिधी या योजना चालू आहेत त्या योजना अंतर्गत तुम्ही बँकेचे वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता. तुमचं शिक्षण कमीत कमी बारावी पास असेल तर तुम्ही शैक्षणिक कर्जासाठी या बँकेमार्फत सहजरीत्या अर्ज करू शकणार आहेत.

जास्तीत जास्त वीस लाखापर्यंत रक्कम हे बँक तुम्हाला देऊ करते आणि या कर्जाची परतफेड तुम्हाला पंधरा वर्षाच्या आत करायला लागते. हे कर्ज घेण्यासाठी तुमचं शिक्षण मान्यताप्राप्त विद्यापीठातून होणं गरजेचं आहे.

कमर्शियल वेहिकल लोन (South Indian Bank Loan for Agri Vehicle)

साउथ इंडियन बँक कमर्शियल क्षेत्रासाठी किंवा कृषी क्षेत्रासाठी गाडी घ्यायची असेल तर त्या गाडीला कर्जाचा पुरवठा करते नवीन गाड्या असो किंवा जुनी गाडी असो ही बँक तुम्हाला कर्ज देते, चार वर्षे पेक्षा जुन्या असेल तरच बँक कर्जाचा पुरवठा करते त्याच्यापेक्षा जास्त जुन्या असेल तर बँक कर्जाचा पुरवठा करत नाही.

कोणत्याही वैयक्तिक व्यक्तीला किंवा कंपनीला ही बँक कर्ज (South Indian Bank Loan) देते त्यासाठी वय कमीत कमी 21 आणि जास्तीत जास्त 65 वर्षे असणे आवश्यक आहे.हे कर्ज एक लाखापासून सुरू होते आणि तुमच्या क्रेडिट स्कोर नुसार या कर्जाचे रक्कम ठरवली जाते. बारा महिने ते साठ महिन्यापर्यंत तुम्हाला हे कर्ज परत फेडायचे असते.

नवीन गाडीसाठी 20% आणि जुन्या गाडीसाठी 25% मार्जिन कंपनी ठेवते, म्हणजे जवळपास 75 ते 80 टक्के कर्ज तुम्हाला दिले जाते तुमचा सिबिल स्कोर 740 असेल तरच ही बँक कर्जाचा (South Indian Bank Loan) पुरवठा करते. यासाठी कमीत कमी पाच हजार किंवा 1.5% एवढे प्रक्रिया शुल्क बँक आकारते.

हे कर्ज घेण्यासाठी तुमची बारा महिन्याची बँक स्टेटमेंट, पॅन कार्ड, आधार कार्ड, आयटी रिटर्न आणि गाडीचे इन्व्हाईस बँकेकडे तुम्हाला सबमिट करणे गरजेचे असते वर वेगवेगळ्या पाच प्रकारच्या लोनची माहिती दिलेली आहे.

या कर्जासाठी तुम्ही बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सविस्तर माहिती घेऊ शकता तसेच त्या कर्जासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुद्धा सादर करू शकता तुम्हाला,गरज असेल आणि अर्ज करायचा असेल तर साउथ इंडियन बँकेच्या अधिकृत संकेतस्थळ https://www.southindianbank.com/ यावर जाऊन तुम्ही सविस्तर माहिती घेऊन ऑनलाईन अर्ज करू शकता.

FAQ

प्रश्न 1 : वैयक्तिक कर्ज म्हणजे काय?
उत्तर : ₹1–20 लाख, 12–60 महिने परतफेड.

प्रश्न 2:कार लोनची सुविधा किती आहे?
उत्तर : नवीन कारसाठी 95% व जुनीसाठी 75% पर्यंत कर्ज.

प्रश्न 3:गृह कर्ज किती मिळू शकते?
उत्तर : ₹5–100 लाख, 5–30 वर्षे परतफेड, 90% पर्यंत सुविधा.

प्रश्न 4:शैक्षणिक कर्ज कोणासाठी आहे?
उत्तर : भारत/परदेश शिक्षणासाठी ₹20 लाख, 15 वर्षे परतफेड.

प्रश्न 5:कमर्शियल वाहन लोनची मर्यादा काय आहे?
उत्तर :नवीन/जुनी गाडी खरेदीसाठी 75–80% पर्यंत कर्ज

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *