आरबीएल बँकेमधून या 6 कर्जाच्या व्याजदरावर मिळतेय चांगली सूट;100% कर्जासाठी उत्तम पर्याय | RBL Bank Loans

RBL Bank Loans

RBL Bank Loans : 1943 मध्ये स्थापन झालेल्या आणि 80 वर्षापासून अधिक काळ कार्यरत असलेली आरबीएल बँक म्हणजे जुनी रत्नाकर बँक लिमिटेड, रत्नाकर बँकेची स्थापना 1943 साली झाली, विसाव्या शतकाच्या जवळपास या बँकेचे नाव बदलून आरबीएल बँक असे ठेवण्यात आले.

ही बँक प्रायव्हेट सेक्टर मधील मोठी बँक आहे 14.31 मिलियन कस्टमर असणाऱ्या या बँकेच्या 528 शाखा संपूर्ण भारतभर कार्यरत आहेत, 1260 बिजनेस करंस्पॉन्डन्ट ब्रांचेस असून 296 बँकेचे आउटलेट आहेत, 408 एटीएम भारतातील 28 राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये आहेत.

आरबीएल बँक एनएससी आणि बीएससी मध्ये नोंदणी असलेली बँक आहे, या बँकेला विविध प्रकारचे अवार्ड्स आणि सन्मान सुद्धा आत्तापर्यंत मिळालेले आहेत. ही बँक चालू खात, बचत खात, इन्स्टिट्यूशनल खात, डिपॉझिट लॉकर, फिक्स डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिट, स्मार्ट डिपॉझिट, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, जीवन विमा, आरोग्य विमा, म्युचल फंड, एनपीएस, डिमॅट अकाउंट मध्ये सुद्धा कार्य करते.

फॉरेक्स सर्विसेस सुद्धा ही बँक प्रोव्हाइड करते या व्यतिरिक्त ही बँक वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज (RBL Bank Loan) सर्वसामान्यांना देते ज्यामध्ये वेहिकल फायनान्स, हाऊसिंग लोन, पर्सनल लोन, फोर व्हीलर लोन, स्मॉल मायक्रो लोन, एज्युकेशन लोन, बिझनेस लोनचा समावेश आहे.

या बँकांमध्ये प्रमुख काही लोनचा समावेश असून त्या प्रमुख लोन विषयीची माहिती आपण खाली बघुयात व ते लोन तुम्ही कसे घेऊ शकता हे सुद्धा पाहूयात.

गृह कर्ज (RBL Home Loan)

तुमचे नवीन घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आरबीएल बँक 90% पासून गृह कर्जाचा पुरवठा करते, हे गृह कर्ज 15 करोड पर्यंत सर्वसामान्यांना दिले जात, तीस वर्षाच्या फ्लेक्सिबल टेनर मध्ये या कर्जाचा परतावा तुम्ही करू शकता. आकर्षक व्याज दरावर तुम्ही हे कर्ज घेऊ शकता.

यामध्ये साडेतीन लाखाचा टॅक्स बेनिफिट सुद्धा उपलब्ध आहे, हे कर्ज (RBL Bank Loan) स्वतः घर बांधण्यासाठी, नवीन फ्लॅट परचेस करण्यासाठी, प्लॉट परचेस करण्यासाठी, घर वाढवण्यासाठी, रिपेअर करण्यासाठी, रेनोवेट करण्यासाठी कर्ज देते. इतर गृह कर्ज या बँकेमध्ये ट्रान्सफर करण्याची सुविधा सुद्धा आरबीएल बँक तुम्हाला देते.

हे कर्ज तुम्हाला 15 ते 30 वर्ष पर्यंत फेडायचे असते तर गृह कर्ज घेऊ इच्छित असाल आरबीएल बँकेचे गृह कर्ज घेऊन पाहणे फायद्याचे ठरते.

वैयक्तिक कर्ज (RBL Bank Loan – Personal Loan)

आरबीएल बँक वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वसामान्यांना वैयक्तिक कर्जाचा पुरवठा करते, वीस लाखापर्यंत ही बँक वैयक्तिक कर्ज देते. शाळेची फी ,मेडिकल्स, मुलांचे खर्च, घरातील कोणाचे लग्न असतील तर त्याच्यासाठी तुम्ही या कर्जाचा वापर करू शकता.

हे कर्ज एक लाख ते वीस लाखापर्यंत तुम्हाला मिळते 12 ते 60 महिन्यांमध्ये या कर्जाची परतफेड करू शकता, कोणतीही सेक्युरिटी किंवा तारण न ठेवता हे कर्ज तुम्हाला सहज उपलब्ध होते. कमीत कमी कागदपत्रांमध्ये आकर्षक व्याज दरावर तुम्ही हे कर्ज घेऊ शकता.

कार लोन (RBL Bank Car Loan)

आरबीएल बँक अंतर्गत जुन्या कारवर सुद्धा लोन दिले जाते हे कर्ज तुम्हाला 30 लाखापर्यंत मिळते कमीत कमी वेळातच कर्ज सॅंक्शन होतं, कमीत कमी कागदपत्रे तुम्हाला इथे दिले जातात तुमच्या घरी येऊन हे सगळी प्रोसेस केली जाते, आकर्षक व्याजदरावर विविध योजना अंतर्गत कर्जाची रक्कम दिली जाते.

जास्तीत जास्त कर्ज देण्याचा हेतू बँकेचा असतो यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता त्याचा टर्म आणि कंडिशन्स आरबीएल बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पाहू शकता ही बँक नवीन कार घेण्यासाठी सुद्धा कर्जाचा पुरवठा करते ऑन रोड प्राईस च्या 90% पर्यंत ही बँक कर्ज देऊ करते.

दुचाकी कर्ज (RBL Bank Two-Wheeler Loan)

दुचाकी साठी सुद्धा ही बँक कर्ज देते नवीन दुचाकी घ्यायची असेल तर तुम्ही आरबीएल बँकेचे दुचाकीचे कर्ज घेऊ शकतो जास्तीत जास्त लोन अमाउंट ऑन द स्पॉट अप्रूव्हल, आकर्षक व्याजदर आणि फ्लेक्झिबल रिपेमेंटची कालावधी असल्यामुळे आणि कमीत कमी कागदपत्रे लागत असल्यामुळे तुम्ही आरबीएल बँकेचे टू व्हीलर लोन घेऊ शकता.

शैक्षणिक कर्ज (RBL Bank Loan – Education Loan)

भारतात किंवा भारताच्या बाहेर उच्च शिक्षणासाठी आरबीएल बँक दहा टक्के पासून पुढे शैक्षणिक कर्ज पुरवते संपूर्ण कोर्सची फी ही बँक अर्जदारांना देते, म्हणजे शंभर टक्के फंडिंग अर्जदारांना इथे मिळते. आंतरराष्ट्रीय व भारतीय शिक्षणासाठी तुम्ही बँका अंतर्गत शैक्षणिक कर्ज साठी अर्ज करू शकता.

फ्लोटिंग रेटवर याचा व्याजदर तुम्हाला लागू होतो शिक्षण आणि तुम्हाला टॅक्स बेनिफिट सुद्धा मिळतात, दोन करोड रुपयापर्यंत तुम्हालाही बँक शैक्षणिक कर्जाचा पुरवठा करते.

व्यावसायिक कर्ज (RBL Bank Business Loan)

हे बँक वैयक्तिक तसेच गृहकर्जा व्यतिरिक्त व्यवसायासाठी सुद्धा कर्जाचा पुरवठा करते, तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल तर व्यवसाय वाढीसाठी तुम्हाला पैसेची आवश्यकता पडत असेल तर आरबीएल बँकेकडून तुम्ही 50 लाखापर्यंत बिजनेस कर्ज घेऊ शकता.

कन्व्हिनियंट रिप्रेमेंटचे ऑप्शन्समध्ये तुम्हाला हे कर्ज मिळते 48 महिन्यांमध्ये तुम्हाला हे कर्ज (RBL Bank Loan) परतफेड करायला लागते, 50 लाखापर्यंत कर्जावर कोणतेही तारण किंवा गहाण ठेवण्याचे तुम्हाला आवश्यकता पडत नाही.

याविषयीची संपूर्ण माहिती आरबीएल बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर तुम्ही पाहू शकता त्यांच्या नियम अटी व शर्ती सुद्धा बँकेचे अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत व नमूद केलेल्या सर्व कर्जासाठी व त्याच्याविषयीच्या माहितीसाठी तुम्ही https://www.rblbank.com/ या आरबीएल बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता आणि त्या संकेतस्थळावरून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने काही कर्जासाठी अर्ज सुद्धा करू शकता.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *