एचडीएफसी बँकेचे हे 5 कर्ज मिळतील खूपच कमी व्याजदरात;पहा सविस्तर | HDFC Bank Loans

HDFC Bank Loans

HDFC Bank Loans : एचडीएफसी बँक आपल्या सर्वांनाच माहित आहे एचडीएफसी बँकेने यावर्षी सर्वाधिक क्रेडिट कार्ड देण्याचा विक्रम सुद्धा केला आहे, खाजगी क्षेत्रातील सर्वोत्तम बँका असलेल्या एचडीएफसी बँकेमधून तुम्ही क्रेडिट कार्ड, चालू खात, बचत खाता या सहित एफ डी, आर डी, इन्शुरन्स सुद्धा घेऊ शकता.

एचडीएफसी बँक जलद गतीने प्रत्येक कर्जाचा निपटारा करते तुम्हाला जर कोणत्या प्रकारचे कर्ज घ्यायचं असेल तर तुम्ही एचडीएफसी बँकेकडे चांगली बँक म्हणून पाहू शकता. एचडीएफसी बँकेकडून कर्ज घ्यायचं असेल तर त्याच्या विविध प्रकारची कर्ज तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाइन पद्धतीने सुद्धा घेऊ शकता.

पीएम मुद्रा लोन, रुरल लोन, शैक्षणिक कर्ज, गृह कर्ज, व्यावसायिक कर्ज, (HDFC Bank Loan) दुचाकी साठी लोन, कार लोन आणि कंजूमरबल लोन सुद्धा पुरविले जाते. वेगवेगळ्या प्रकारच्या सात-आठ कर्जासाठी तुम्ही एचडीएफसी बँकेमध्ये अर्ज करू शकता. विविध कर्जाची सविस्तर माहिती तुम्हाला खाली दिलेल्या कर्जापैकी महत्त्वाचे जे कर्ज आहेत.

त्या कर्जासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा एचडीएफसी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करू शकता या संकेतस्थळा विषयी माहिती खाली दिलेल्या आहे.

वैयक्तिक कर्ज (HDFC Bank Personal Loan)

गरजेच्या काळामध्ये अत्यंत उपयुक्त पडणारे वैयक्तिक कर्ज (HDFC Bank Loan) एचडीएफसी बँक चांगल्या व्याजदरावर तुम्हाला देते, कमीत कमी कागदपत्रांमध्ये तुम्ही वैयक्तिक कर्ज अगदी काही सेकंदामध्ये तुमच्या अकाउंटला घेऊ शकता. तब्बल 40 लाखापर्यंत एचडीएफसी बँक वैयक्तिक कर्जाचा पुरवठा करते.

यासाठी तुम्हाला 2149 रुपये एवढा एक लाख रुपये साठी हप्ता भरावा लागतो बँकेने त्यांच्या संकेतस्थळावर सांगितल्यानुसार दहा सेकंदामध्ये तुम्ही तुमच्या अकाउंटला पैसे घेऊ शकता, यासाठी सुद्धा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता त्याची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे.

कंजूमर ड्युरेबल लोन (HDFC Consumer Durable Loan)

आपल्याला कोणतीही वस्तू घरात घ्यायची असेल तर आपण बाजारामध्ये गेल्यानंतर विविध प्रकारच्या EMI चे पर्याय आपल्याकडे वस्तू घेण्यासाठी उपलब्ध असतात, यामध्ये बजाज फायनान्स आहे, आयडीएफसी फस्ट इतर बँका सुद्धा कंजूमर ड्युरेबल लोन देतात, एचडीएफसी बँक त्यांच्या डेबिट कार्डवर आणि क्रेडिट कार्डवर कंजूमर ड्युरेबल लोन देते.

कोणत्याही व्याजदराशिवाय तुम्ही ही लोन सहजरीत्या उपलब्ध करून घेऊ शकता काही वेळामध्ये या लोन (HDFC Bank Loan) सुद्धा तुम्हाला मिळतं, कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंटेशन किंवा कागदपत्रे तुम्हाला येथे जमा करण्याची गरज पडत नाही.

कार लोन (HDFC Bank Loan – Car Loan)

तुम्ही नवीन वाहन घेण्यासाठी कर्ज घेऊ शकता जर तुम्ही कार घेण्याची तयारी करत असाल तर एचडीएफसी बँकेचा न्यू कार लोन तुमच्यासाठी उपयोगाच आहे, जर तुम्ही जुनी कार घेणार असाल तर त्यासाठी सुद्धा एचडीएफसी बँक 100% फंडिंग देते. सात वर्षांमध्ये तुम्हाला हे कर्ज फेडायचं असतं.

30 मिनिटांमध्ये या कर्जाचा तुम्हाला अप्रोवल मिळत नवीन कार घेण्यासाठी सुद्धा तब्बल 90% पर्यंत कर्जाचा (HDFC Bank Loan) पुरवठा एचडीएफसी बँक करते 9 टक्के व्याजदर बँकेचे वाहन कर्जासाठी असू शकते.

दुचाकी कर्ज (HDFC Two Wheeler Loan)

दुचाकी वाहन घेण्यासाठी तुम्ही शोरूम ला गेल्यानंतर शोरूम वाल्यांनी दिलेल्या कर्जावर किंवा कंपनीवर विश्वास ठेवून तुम्ही दुचाकीचे कर्ज घेतात त्या व्यतिरिक्त जर तुम्ही हे कर्ज एचडीएफसी बँकेतून घेतले तर चांगल्या पद्धतीचे व्याजदर सुद्धा तुम्हाला इथे मिळत. एचडीएफसी बँक दुचाकी मध्ये सुपर बाईक लोन ज्याचे दोन लाखापर्यंत फंडिंग तुम्हाला मिळत.

जास्तीत जास्त साडेसात लाख रुपये पर्यंत लोन तुम्हाला एचडीएफसी बँक देऊ करते, दुचाकी इतर बँका पेक्षा दोन टक्के कमी व्याजदराने एचडीएफसी बँक दुचाकी वाहण्यासाठी कर्ज देते, पंधरा मिनिटांमध्ये तुम्ही पात्र असेल तर हे कर्ज मंजूर होते आणि सदर अकाउंट ला जमा होते.

12 महिन्यापासून 48 महिने पर्यंत हप्ता भरण्याचा पर्याय तुम्ही या बँके मार्फत निवडू शकता यासाठी सुद्धा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

व्यवसायिक कर्ज (HDFC Bank Loan – Business Loan)

एचडीएफसी बँकेमध्ये जर तुमचं चालू खात असेल तर तुम्हाला व्यवसायिक कर्ज (HDFC Bank Loan) सहजरीत्या मिळू शकत, चालू खाते नसले तरी तुमची पात्रता तपासणी एचडीएफसी बँक तुम्हाला कर्जाचा पुरवठा करते. तुमची पात्रता फक्त एका मिनिटांमध्ये चेक करून तुम्ही व्यावसायिक कर्ज घेऊ शकता.

विविध प्रकारचे फायदे या बँकेमार्फत तुम्हाला व्यावसायिक कर्जामध्ये मिळत असतात तब्बल 75 लाख पर्यंत कर्ज तुम्हाला एचडीएफसी बँक व्यवसायासाठी देते त्यावर 1 लाख ते 25 लाख रुपये OD फॅसिलिटी सुद्धा तुम्हाला मिळते, 48 महिन्यांमध्ये तुम्ही या कर्जाची परतफेड करू शकता.

ठरलेल्या हप्त्याच्या अगोदर जर तुम्ही कर्जाची परतफेड केले तर कोणत्या प्रकारचे चार्जेस लावत नाही कागदपत्र सुद्धा खूप कमी लागतात त्यामुळे व्यावसायिक कर्जासाठी एचडीएफसी बँक के कडे तुम्ही चांगली बँक म्हणून पाहू शकता.

गृह कर्ज (HDFC Bank Home Loan)

एचडीएफसी बँक गृह कर्ज सुद्धा अधिक चांगल्या व्याजदरावर तुम्हाला देते, गृह कर्जासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता 8.50% पासून गृह कर्जाचा व्याजदर चालू होतो, रेपो रेट नुसार हे व्याजदर असून ज्या वेळेस तुम्ही कर्ज घेणार असाल त्यावेळेस व्याजदर वेगळा असू शकतो.

एलिजिबिलिटी कॅल्क्युलेटर नुसार तुम्ही किती कर्जासाठी पात्र असाल हे सुद्धा पाहू शकता आणि त्या कर्जासाठी तुम्हाला किती हप्ता येईल याची माहिती सुद्धा तुम्ही घेऊ शकता विविध प्रकारचे कागदपत्रे तुला तुम्हाला जमा करायला लागतात त्यासाठी तुम्ही बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन संपूर्ण माहिती घेऊ शकतात.

होम लोन म्हणजे गृह कर्जासाठीच एक अधिकृत पेज बँकेने बनवलेला असून त्यावर सगळ्या प्रकारची माहिती दिलेली आहे वर दिलेल्या कर्जा व्यतिरिक्त पीएम मुद्रा लोन, शैक्षणिक कर्ज,ग्रामीण भागासाठी सुद्धा एचडीएफसी बँक कर्जाचा (HDFC Bank Loan) पुरवठा करते.

तुम्ही जर कर्ज घेण्यासाठी इच्छुक असाल आणि तुम्हाला खरच कर्जाची गरज असेल तर तुम्ही एचडीएफसी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता एचडीएफसी बँकेचे अधिकृत संकेतस्थळ https://www.hdfcbank.com/ हे आहे यावर जाऊन तुम्ही कर्ज विषयीची सविस्तर माहिती पाहू शकता आणि वाटेल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुद्धा करू शकता.

FAQ

प्रश्न 1: एचडीएफसी बँक वैयक्तिक कर्ज (Personal Loan) किती रक्कमपर्यंत देते?
उत्तर: कमीत कमी कागदपत्रांमध्ये तब्बल ₹40 लाखापर्यंत वैयक्तिक कर्ज मिळते; परतफेड कालावधी 60 महिने आहे.

प्रश्न 2: कंजूमर ड्युरेबल लोन (Consumer Durable Loan) घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?
उत्तर: कोणतेही अतिरिक्त डॉक्युमेंटेशन लागत नाही; डेबिट/क्रेडिट कार्डवर व्याजमुक्त EMI सुविधा दिली जाते.

प्रश्न 3: कार लोन (Car Loan) अंतर्गत किती फंडिंग मिळते आणि परतफेड कालावधी किती आहे?
उत्तर: नवीन कारसाठी 90% पर्यंत व जुनी कारसाठी 100% फंडिंग मिळते; परतफेड कालावधी 7 वर्षे आहे.

प्रश्न 4: दुचाकी कर्ज (Two Wheeler Loan) अंतर्गत जास्तीत जास्त किती रक्कम मिळते?
उत्तर: सुपर बाईकसाठी ₹2 लाख आणि इतर दुचाकीसाठी ₹7.5 लाखापर्यंत कर्ज मिळते; व्याजदर इतर बँकांपेक्षा कमी आहे.

प्रश्न 5: व्यवसायिक कर्ज (Business Loan) अंतर्गत किती रक्कम मिळते आणि कोणते फायदे आहेत?
उत्तर: ₹75 लाखापर्यंत व्यवसायिक कर्ज मिळते; ₹1–25 लाख OD सुविधा, कमी कागदपत्रे व प्रीपेमेंट चार्जेस नाहीत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *