Nainital Bank Loans : नैनिताल बँक मर्यादितची स्थापना 1922 मध्ये झाली नैनीताल बँक हि ऑफ बडोदाची उपबँक आहे, 168 शाखेसह भारतातल्या पाच राज्यामध्ये कार्य करते,बँका अंतर्गत विविध सुविधा सर्वसामान्य पुरवल्या जातात त्यामध्ये चालू खाते, बचत खाते, एटीएम कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग याची सुद्धा सुविधा नागरिकांना दिली जाते.
विविध प्रकारचे कर्ज सर्वसामान्य नागरिकांना दिले जातात त्यामध्ये गृह कर्ज, शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, एमएसएमई लोन, कृषी कर्ज, कार्पोरेट लोन व सोनेतारण कर्जाचा (Nainital Bank Loan) समावेश आहे. या बँकांतर्गत विविध प्रकारचे डिपॉझिट सुद्धा तुम्ही बँकेत ठेवू शकता फिक्स डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिट, टॅक्स सेविंग डिपॉझिट सुद्धा बँकेमध्ये स्वीकारले जाते.
या बँका अंतर्गत दिला जाणाऱ्या प्रमुख पाच कर्ज विषयी आपण सविस्तर माहिती घेऊयात त्यासाठी अर्ज कशा पद्धतीने तुम्ही करू शकतात हे सुद्धा पाहुयात.
गृह कर्ज (Nainital Bank Home Loan)
अपना आशियाना योजनेअंतर्गत नैनिताल बँक गृह कर्ज पुरवठा करते नवीन घर घेण्यासाठी, घराच बांधकाम करण्यासाठी, प्लॉट घेऊन त्याच बांधकाम करण्यासाठी, इतर बँकेचे गृह कर्ज आपल्या बँकेमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी ही बँक सर्वसामान्य नागरिकांना गृह कर्जाची सुविधा देते.
कमीत कमी 21 वर्षे वय असणाऱ्या अर्जदारांना जास्तीत जास्त 500 लाखापर्यंत गृहकर्ज (Nainital Bank Loan) ही बँक देते 10 ते 25 टक्क्यापर्यंत मार्जिन ठेवून तुम्हाला जास्तीत जास्त 75 ते 90 टक्के कर्ज ही बँक प्रोव्हाइड करते. तीस वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला हे कर्ज परतफेड करायचे असते.
यासाठी तुम्हाला कोणताही व्यक्ती गॅरेंटर म्हणून लागत नाही, ही बँक नैनी होम टॉप,नैनी होम इम्प्रूमेंट लोन अंतर्गत गृह कर्जाच्या आणखी दोन पर्याय तुमच्या समोर ठेवते.
वाहन कर्ज (Nainital Bank Vehicle Loan)
सुहाना सफर योजनेअंतर्गत नैनितल बँक चार चाकी, दुचाकी साठी सुविधा देते. जुनी गाडी असेल तर तीन वर्षापेक्षा कमी जुनी असणाऱ्या गाडीवर सुद्धा ही बँक कर्ज देते. यासाठी तुम्ही पगारदार वर्गातून असणे गरजेच आहे, पेन्शनर असाल किंवा इतर माजी सैनिक असाल तरी तुम्ही कर्ज घेऊ शकता.
हे कर्ज बिजनेस मॅन, प्रोफेशनल आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा मिळू शकते यासाठी तुमचं वय कमीत कमी 21 आणि आणि को अँप्लिकण्ट असाल तर कमीत कमी 18 वर्षे असणे आवश्यक आहे, जास्तीत जास्त 70 वर्षापर्यंत हे कर्ज (Nainital Bank Loan) तुम्हाला मिळू शकते. हे कर्ज 100 लाखापर्यंत अर्जदाराला मिळू शकते.
नवीन चार चाकी गाडी घेऊ इच्छित असाल तर 90% पर्यंत ऑन रोड प्राईस वर बँक फंडिंग देते तर जुन्या गाडीसाठी 85% ऑन रोड प्राईस वर ही बँक फंडिंग देत आहे. गृह कर्ज घेणाऱ्या व्यक्तींसाठी ही बँक 0.25 टक्के एवढी कन्सेशन हि बँक देऊ करते.
वैयक्तिक कर्ज (Nainital Bank Loan – Personal Loan)
नैनी सहयोग या योजनेअंतर्गत ही बँक वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी वैयक्तिक कर्ज पुरवते पब्लिक सेक्टर मधील बँकासाठी, सरकारी कर्मचाऱ्यासाठी, खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी, प्रोफेशनल साठी ही बँक वैयक्तिक कर्ज देते. याच्यासाठी कमीत कमी 21 वर्षांनी जास्तीत जास्त 70 वर्षापर्यंत तुमचे वय असं आवश्यक आहे.
पंधरा लाखापर्यंत ही बँक तुम्हाला कर्ज देऊ शकते क्रेडिट फॅसिलिटी अंतर्गत ओव्हरड्रॅफ़्ट फॅसिलिटी तुम्हाला बँक देते हे कर्ज तुम्हाला सात वर्षे ते बारा वर्षाच्या आत मध्ये फेडायचे असते, कोणतेही फोर क्लोजर किंवा प्रे पेमेंट चार्जेस बँक आकारात नसल्यामुळे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी हे एक चांगला पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे.
शैक्षणिक कर्ज (Nainital Bank Education Loan)
ज्ञानी योजनेअंतर्गत ही बँक प्रोफेशनल कोर्सेस, टेक्निकल कोर्सेस साठी भारतभर आणि भारताच्या बाहेर सुद्धा शैक्षणिक कर्ज पुरवठा करते, यासाठी फक्त अर्ज करणारा विद्यार्थी हा भारतीय असणे आवश्यक आहे. वयाची कोणतीही आहे, जास्तीत जास्त 75 लाखापर्यंत ही बँक कर्जाचा पुरवठा करते.
चार लाखापर्यंत तुम्ही कर्ज घेत असाल तर शिक्षणाच्या एकूण 95 टक्के कर्ज बँक देते चार लाखापेक्षा अधिक कर्ज जर तुम्ही बँकेतून घेत असाल तर 85% पर्यंत कर्ज हे बँक तुम्हाला देते. यासाठी दहा वर्षाचा कालावधी बँक ठेवते चार लाखापर्यंत कोणतेही सेक्युरिटी गॅरेंटर किंवा प्रोसेसिंग फी ही बँक लावत नाही, आकर्षक व्याज दारावर ही बँक कर्ज देऊ करते उमेदवार जर महिला असेल तर त्यासाठी वेगळी सूट या बँकेमार्फत दिल्या जाते.
एमएसएमई लोन (Nainital Bank MSME Loan)
वैयक्तिकरित्या पुरवल्या जाणाऱ्या वरच्या सर्व कर्ज व्यतिरिक्त बँक व्यवसायासाठी सुद्धा कर्ज (Nainital Bank Loan) देते, एमएसएमई लोन अंतर्गत व्यापार सुविधा देते, नैनी उद्योग, प्रसार स्कीम, नैनी उद्योग सुविधा स्कीम, नैनी शिक्षा प्रसाद, नैनी हेल्थकेअर स्कीम या योजनेअंतर्गत नैनिताल बँक व्यावसायिक साठी कर्जाचा पुरवठा करते.
तुम्हाला बँकेचे विविध कर्ज विषयीची माहिती पाहिजे असेल आणि या बँकेअंतर्गत व्यावसायिक कर्ज जर घ्यायचे असेल तर तुम्ही बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सविस्तर माहिती पाहू शकता. वैयक्तिक कर्ज तुम्हाला 100 लाखापर्यंत मिळते यासाठी 25% ते 35 टक्के एवढी मार्जिन बँक ठेवते.
120 महिन्यांमध्ये तुम्हाला या कर्जाची परतफेड करायची असते पण पाच लाखापर्यंत कोणताही गॅरेंटर किंवा क्रेडिट फॅसिलिटी घ्यायची असेल तर गहाण स्वरूपात किंवा गॅरेंटर देण्याच्या आवश्यकता तुम्हाला पडत नाही, वर दिलेल्या सर्व कर्जाची माहिती बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून https://www.nainitalbank.co.in/ यावर गेल्यानंतर तुम्ही सविस्तर कर्जाविषयीची माहिती पाहू शकता व आवश्यक असलेले कर्ज घेऊ शकतात काही कर्जासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुद्धा करू शकता.
FAQ
प्रश्न 1: नैनिताल बँक गृहकर्ज (Home Loan) किती रक्कमपर्यंत देते?
उत्तर: अपना आशियाना योजनेअंतर्गत जास्तीत जास्त ₹500 लाखापर्यंत गृहकर्ज मिळते; परतफेड कालावधी 30 वर्षे आहे.
प्रश्न 2: वाहन कर्ज (Vehicle Loan) कोणाला मिळते आणि किती टक्के फंडिंग मिळते?
उत्तर: पगारदार, पेन्शनर, माजी सैनिक, शेतकरी व प्रोफेशनल पात्र आहेत; नवीन गाडीसाठी 90% आणि जुन्या गाडीसाठी 85% ऑन-रोड किंमतीपर्यंत कर्ज मिळते.
प्रश्न 3: वैयक्तिक कर्ज (Personal Loan) अंतर्गत किती रक्कम मिळते आणि परतफेड कालावधी किती आहे?
उत्तर: नैनी सहयोग योजनेअंतर्गत ₹15 लाखापर्यंत कर्ज मिळते; परतफेड कालावधी 7 ते 12 वर्षे आहे.
प्रश्न 4: शैक्षणिक कर्ज (Education Loan) अंतर्गत किती टक्के खर्च बँक कव्हर करते?
उत्तर: ₹4 लाखापर्यंत 95% खर्च आणि ₹4 लाखांपेक्षा जास्त कर्जासाठी 85% खर्च बँक कव्हर करते; जास्तीत जास्त ₹75 लाखापर्यंत कर्ज मिळते.
प्रश्न 5: एमएसएमई लोन (MSME Loan) अंतर्गत व्यवसायिकांना किती कर्ज मिळते?
उत्तर: नैनी उद्योग व इतर योजनांअंतर्गत ₹100 लाखापर्यंत कर्ज मिळते; परतफेड कालावधी 120 महिने आहे